
करमाळा प्रतिनिधी
जीवन जगत असताना आपण केलेल्या कामाची पोचपावती समाजाकडुन पुरस्काराने मिळत असते. या पुरस्कारामुळे माणसाला काम करण्यासाठी नवीन ऊर्जा वाढते अशा कर्तुत्ववान लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार

राजा माने यांच्या कार्य गौरव पुरस्काराचा करमाळा डिजीटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी व्यक्त केले. करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक

संघटनेच्यावतीने जेष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रम शनिवार दिनांक २७ एप्रिल रोजी गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था नगर रोड करमाळा येथे संपन्न झाला. यावेळी पुढे बोलताना ते मनोज राऊत म्हणाले की, सध्याचे

युग डेटाचे युग आहे. ज्याच्याकडे जितका जास्त डेटा तितका तो व्यक्ती श्रीमंत डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना ही संधी आहे. आपण घेतलेल्या सूक्ष्म नोंदी आणि लोकांचे घेतलेले विविध विडिओ हे पत्रकारांचे रिटायरमेंट प्लॅन होऊ शकतात. भविष्यात बॉलीवूड असेल किंवा वेगवेगळ्या वेब सिरीज असतील त्यांना कलाकृती निर्मिती साठी लागणार डेटा हा पत्रकारांच्या माध्यमातून मिळू शकणार आहे आणि त्यासाठी भरभक्कम अशी रॉयल्टी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. तरी सर्व पत्रकारांनी आपला डेटा एका हार्ड डिस्क मध्ये सेव्ह करून ठेवावा. म्हणजे खऱ्या अर्थाने आपले भविष्य सूरक्षीत उज्वल आत्मनिर्भर होईल असे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजा माने होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये करमाळा तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतिश सावंत, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार राजा माने प्रमुख पाहुणे व मान्यवर अधिकारी यांचा सत्कार शाल, श्रीफळ व श्री कमलादेवीची प्रतिमा देऊन करण्यात आला. करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्यावतीने गुरूंच्या प्रति असलेला प्रेमभाव, समर्पण भाव, गुरुचा अनमोल ठेवा प्रत्येकाच्या जीवनात रहावा या भावनेतून महाराष्ट्रात प्रथमच आपण जेष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्काराची सुरूवात केली. असल्याचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी सांगितले. या कार्यक्रमांमध्ये शैक्षणिक सामाजिक विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा ज्येष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये सामाजिक कार्य केल्याबद्दल श्रेणिकशेठ खाटेर यांना जीवन गौरव पुरस्कार, शैक्षणिक कार्याबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळसर सर यांना जीवन गौरव पुरस्कार करमाळा शहर तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रा.डॉ. महेश निकत सर यांना युवा आयकॉन पुरस्कार सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ॲड. अजित विघ्ने यांना युवा आयकॉन युवा नेता पुरस्कार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भीष्माचार्य चांदणे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबरच करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा राजा माने कार्य गौरव पुरस्काराने ट्रॉफी सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन जेष्ठ पत्रकार राजा माने यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले साप्ताहिक सल्ला, दैनिक पुढारीचे पत्रकार आशपाक सय्यद, शितलकुमार मोटे टीव्ही नाईन मराठी, राजाराम माने दैनिक सकाळ केतुर नं. १, संजय शिंदे दैनिक शिव निर्णय, राजेश गायकवाड सर दैनिक दामाजी एक्स्प्रेस, विजय निकत दैनिक जनसत्य, अंगद भांडवलकर मायमराठी न्युज, सूर्यकांत होनप राष्ट्र प्रथम न्यूज, नरेंद्रसिंह ठाकूर सूर्यमुद्रा पोर्टल, राहुल रामदासी समर्थ महाराष्ट्र न्यूज, ज्ञानदेव काकडे परिवर्तन न्यूज या पत्रकारांचा ज्येष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी श्रेणिकशेठ खाटेर, प्रा.महेश निकत सर ॲड. अजित विघ्ने, भीष्माचार्य चांदणे यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नावाने त्यांच्या शुभहस्ते पुरस्कार मिळाल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये नवीन उमेद मिळाली असून आता खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढली आहे. करमाळा डिजिटल मीडियाने पत्रकार संपादक संघटनेने आमचा जो गौरव केला त्याचे ऋण कायम मनात ठेवून आम्ही चांगले काम करून आपण दिलेल्या पुरस्काराचे नक्कीच सार्थक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री कमलादेवी फोटोचे पूजन करून दिप प्रज्वलन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना तालुका अध्यक्ष दिनेश मडके, उपाध्यक्ष शितलकुमार मोटे, सचिव नरेंद्रसिंह ठाकुर, प्रसिद्धीप्रमुख अंगद भांडवलकर, व्यवस्थापक सूर्यकांत होनप, सदस्य राहुल रामदासी, संघटक ज्ञानदेव काकडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमप्रसंगी गोसेवक सचिन महाराज औटी यांनी श्रेणिकशेठ खाटेर यांच्या गुरु गणेश दिव्यरत्न गोशाळेसंबधी त्यांच्या कार्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. गोवंश वाचण्यासाठी अखिल मानव जातीचे सहकार्य असणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. गोवंश वाचला तरच खऱ्या अर्थाने मानवाचे जीवन सुख समृद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपण या कार्यामध्ये तन-मन धनाने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. करमाळा डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचा ज्येष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखदारपणे गोमातेच्या आशीर्वादाने गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेमध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी केले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सचिव नरेंद्रसिंह ठाकुर, शितलकुमार मोटे यांनी केले तर आभार आशपाक सय्यद यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितीन चोपडे यांनी केले. या कार्यक्रमास शैक्षणिक सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.