करमाळा प्रतिनिधी
कुगांव व चिखलठाण नं.२ येथील कायम रहिवासी असून आमच्या गावाला तीन वर्षापूर्वी सार्वजानिक बांधकाम विभागाकडून कुगांव ते चिखलठाण नं.१ हा रस्ता मंजूर होऊन आलेला आहे. त्या रस्त्याचे काम मागील तीन वर्षापासून ठेकेदार पूर्ण करीत
नाही. झालेले काम अत्यंत खराब झालेले आहे. तरी आम्ही सातत्याने प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांना गेली दोन वर्षे भेटून सर्व प्रकारची तोंडी व लेखी माहिती देत आहोत. आम्ही गावकर्यांनी उपोषनाचा व आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर
त्यावर पोलीस प्रशासनाने आम्हाला लेखी देऊन दोन महिन्याच्या आत काम पूर्ण करून देतो असे आश्वासन दिले, तरी काम पूर्ण होत नाही. दोन दिवसात काम चालू न झाल्यास आम्ही येणाऱ्या ७ तारखेच्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालत
आहे. तसेच आम्ही सर्व शेतकरी असून आमच्या शेतीपम्पाची वीज आठ तासामधून कमी करून सहा तास केलेली आहे. ती वीज आम्हाला पाहिजे त्या दाबाने मिळत नाही. आमची वीज पुर्वीप्रमाणे कायमस्वरूपी आम्हाला मिळावी. या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास दोन्ही गावाचे नागरिक इथून पुढे होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये भाग घेणार नाही. असे निवेदन सर्व ग्रामस्थ कुगांव व चिखलठाण नं. २ यांनी निवडणूक अधिकारी करमाळा, तहसीलदार करमाळा व पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिले आहे.