
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र गायक प्रवीण कुमार अवचर यांना अगरवाल समाज फेडरेशन, गोल्डन क्लब यांच्यातर्फे काल दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी प्रवीण कुमार यांचे कलाक्षेत्रामधील गेले वीस वर्षापासून चे योगदान व विविध देशांमध्ये आपली कला सादर करून देशासह पुण्याचे हे नाव उंचावले आहे. त्याबद्दल त्यांना उत्कृष्ट गायक हा पुरस्कार देऊन

सन्मानित करण्यात आले. यावेळीं अगरवाल फेडरेशनचे प्रेसिडेंट- कृष्णकुमार गोयल, व्हाईस प्रेसिडेंट – विनोद जी बंसल, सेक्रेटरी – कृष्णालाल बंसल, ट्रेझर – शाम गोयल, गोल्डन क्लबचे प्रेसिडेंट – सरस्वती जी गोयल, व्हाईस प्रेसिडेंट के. बी. गोयल, सेक्रेटरी – संजीव अगरवाल, ट्रेझर – सुनील जे गोयल, कॉर्डिनेटर – जय किशन गोयल, आयपीपी विनोद अगरवाल,

प्रमुख पाहुणे पंकज जी बंसल व सर्व मान्यवर सदस्य यांच्यासह बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट ज्युनिअर अमिताभ बच्चन शशिकांत पेडवाल तसेच पुणे येथील प्रवीणकुमार यांचे ऑर्केस्ट्रा ग्रुपचे इंटरनॅशनल कलाकार व इतर मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम पुणे येथील गंगाधाम चौक रोड राजयाेग बॅंनक्यूट हॉल, येथे आयोजित करण्यात

आला होता. यामध्ये प्रवीणकुमार व त्यांच्या आर्केस्ट्रा संचातील कलाकारांनी नव्या, जुन्या चित्रपटाची गाणी सादर करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच ज्यु. अमिताभ बच्चन शशिकांत पेडवाल यांनीही बिग बी यांचा हुबेहूब दमदार परफॉर्म करत सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.

या पुरस्काराबद्दल मांगी ग्रामस्थ यांच्यासह करमाळा तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वैद्यकीय, इतर अनेक क्षेत्रातील लोकांनी भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

