नगर -टेंभूर्णी रस्त्यावरील जातेगाव ते टेंभूर्णी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी – भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप
करमाळा प्रतिनिधी
नगर -टेंभूर्णी रस्त्यावरील जातेगाव ते टेंभूर्णी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी – युवा नेते शंभूराजे जगताप [सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांना दिले याबाबत निवेदन ] नगर – टेंभूर्णी हायवे वरील करमाळा तालुक्यातील मौजे जातेगाव ते टेंभूर्णी दरम्यान चा रस्ता हा अतिशय खराब झालेला असून या रस्त्यावर मोठ -मोठे खड्डे पडले आहेत .वाहन चालकांना या खराब रस्त्यामुळे खूप कसरत करावी लागत आहे . हा रस्ता छोट्या – मोठ्या वाहनां सह जड वाहतूकीच्या वाहनांच्या रहदारीचा आहे . त्यामूळे दररोज २ – ३ अपघात या रस्त्यावर होवून नाहक जीव जात असून कित्येकांना हात – पाय गमवावे लागत आहेत . एकंदरीत मृत्यूचा सापळा बनलेला हा रस्ता तात्काळ खड्डे बुजवून दुरुस्त करून खड्डेमुक्त करावा व नागरिकांना दिलासा द्यावा या विनंती चे निवेदन भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष तथा जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी संबंधित रोड अथॉरिटी कडे दिले आहे .