करमाळा प्रतिनिधी
पक्षसंघटनेने दिलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने समर्थपणे संभाळून भाजपाचे काम वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असा आत्मविश्वास नूतन भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य धनंजय ताकमोगे यांनी व्यक्त केला
त्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी केम च्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केम शहराध्यक्ष गणेश तळेकर हे होते यावेळी नूतन सोलापूर जिल्हा चिटणीस श्याम सिंधी यांचाही सत्कार करण्यात आला, पुढे बोलताना ताकमोगे म्हणाले केम मधील जनतेने विधानसभा असो या लोकसभा असो या निवडणुकीमध्ये वेळोवेेळी चांगले मताधिक्य दिलेले आहे पुढील काळातही होणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही पुढील काळामध्ये भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने केम परिसरामधील विकास कामे शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यावर आपला भर राहील लवकरच भाजपचे शिष्टमंडळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार .आहे यावेळी प्रहार तालुकाध्यक्ष संदीप तळेकर भाजपा माजी तालुका उपाध्यक्ष रघुनाथ मामा सावंत ओबीसी माजि जिल्हा उपाध्यक्ष विकास लोहार
किसान मोर्चा माजी तालुकाध्यक्ष राहुल रामदासी ,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सागर नागटिळक, माजी युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष उत्तरेश्वर कामठे पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर, शंकर तळेकर, हर्षद गाडे, नागेश तळेकर, अक्षय गोडसे, अशोक केंगार ,बापू वेदपाठक आदी जण उपस्थित होते