घारगाव मध्ये अवैध दारू, गुटखा विक्रेते व जुगार खेळणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी- ग्रामस्थांची मागणी
करमाळा प्रतिनिधी
ग्रामपंचायत घारगाव कार्यालय परिसर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरामध्ये गावातील काही लोक दारू पिऊन काचेच्या बाटल्या फोडतात तसेच गुटखा व तंबाखू खाऊन परिसर अस्वच्छ करतात. गावातील सार्वजनिक ठिकाणी जुगार
खेळला जातो. त्यामुळे काचा लहान मुले व अन्य नागरिकांना लागून जखमा होण्याची शक्यता आहे. शाळेच्या परिसरात होरंड्यात बसून दारू पितात गुटखा व तंबाखू खाऊन तेथेच थुकतात अशा नागरिकांवर नियमाप्रमाणे ठोस कार्यवाही व्हावी.
सदरच्या बेकायदेशीर गोष्टीवर ग्रामपंचायत मार्फत कार्यवाही करावी. असा लेखी अर्ज ग्रामस्थ रमेश निवृत्ती होगले यांनी दिलेला आहे. त्यावर चर्चा करण्यात आली असता दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत चाललेले आहेत. तसेच गावातील
तरुण पिढी व्यसनाधीन होऊन बरबाद होत चाललेली आहे. सदरच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करावी आणि गावातील अवैद्य दारू व गुटखा विक्री बंद व्हावी अशी मागणी ग्रामस्थां कडून करण्यात आली.