करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील १०४ वर्षांचा योध्दा केरु (नाना) विठोबा कोकरे यांनी आपल्या नातू तथा पश्चिम महाराष्ट्राचे वेतन पडताळणी अधिकारी दयानंद धुळाभाऊ कोकरे यांच्यासमवेत कुगाव ता. करमाळा जि. सोलापूर येथे २४४ करमाळा विधानसभा
मतदारसंघात २०२४ च्या विधानसभेसाठी मतदान केले. लोकशाही बळकट करण्यासाठी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली लोकसभा १९५२ पासुन आज पर्यंतच्या सर्वच लोकसभेसाठी तर मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६२ च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून केरु (नाना) कोकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.