आदिनाथचे चेअरमन डोंगरे यांनी केला मोठा भ्रष्टाचार-संचालक नितीन जगदाळे
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप माजी आमदार नारायण पाटील गटाचे समर्थक संचालक नितीन जगदाळे यांनी केला आहे.
जगदाळे म्हणाले की,
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील ठेकेदाराला दीड कोटी रुपयांची साखर विकली आहे त्यामध्ये टक्केवारी घेतली आहे
आताही राहिलेली साखर विकण्याचा डाव करीत आहे तसेच बंद काळातील बफर स्टॉक मधील जमा वजा खर्च करून त्यातही अनेक खोटी बिले काढुन भ्रष्टाचार केला आहे शासनाने एक कोटी सत्तर लाख अनुदान दिले होते तेही तसेच केले आहे.बत्तीस कर्मचारी 85% वाले 100% केले आहे पगार वाढुन प्रमोशन दिले त्यांच्याकडून पंचवीस पस्तीस हजार रुपये घेतले आहे.आदिनाथ कारखान्याच्या समोर पवार हाँटेल आहे त्याच्याकडे जेसीबी नाही रस्त्याची कामे करण्या संदर्भातील काही साहित्य नाही तरीसुद्धा खोटे बिले काढुन लाखो रुपयांची अफरातफर केली आहे
चेअरमन धनंजय डोंगरे,कार्यकारी संचालक अरून बागनवर,वसुलदार मंगेश देवकर यांनी हा भ्रष्टाचार केला आहे यांच्या वर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी आदिनाथ कारखाना सहकारी तत्वावर राहावा म्हणून काय काय प्रयत्न केले आहेत हे संपुर्ण तालुका जिल्ह्याच्या नेते मंडळींना माहिती आहे बागल गटाचे डोंगरे यांच्या भ्रष्टाचार कारभारामुळे आता आगामी आदिनाथ निवडणूकी मध्ये पाटील गट स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे असेही अखेर संचालक नितीन जगदाळे यांनी सांगितले आहे
…..
जगदाळे यांनी केलेले आरोप सर्व खोटे आहेत आम्ही सर्व कामकाज पारदर्शकपणे केला आहे याबाबत सर्व माहिती आपणास दुपारी येऊन देतो- चेअरमन धनंजय डोंगरे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना, करमाळा