l करमाळा शहर विकासासाठी दोन कोटी मंजूर

जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या सहकार्याने करमाळा शहराच्या विकासाची दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याची कामे चांगल्या दर्जाची व्हावीत यासाठी शिवसेना दक्ष राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली
यावेळी तालुका प्रमुख देवानंद बागल शहर प्रमुख संजय शीलवंत युवा सेनेची जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियंका गायकवाड उपशहर प्रमुख नागेश महिला आघाडी शहर प्रमुख पुष्पाताई शिंदे रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण आधीच उपस्थित होते
श्रावण नगर येथे रस्ते डांबरीकरण व गटार काम काम करणे ५५ लाख रुपये राशिन पेठतील रस्ता डांबरीकरण करणे 25 लाख रुपये
राशीन पेठ रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटार बांधकाम करणे तीस लाख रुपये
कृष्णाजी नगर ते नेटके हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण करणे 20 लाख
नेटके हॉस्पिटल ते बाहुबली घर ते वीर बिल्डिंग रस्ता डांबरीकरण करणे तीस लाख रुपये
निकम घर ते राजमाने घर काँक्रीट गटार बांधणे दहा लाख
रुपये
रामभाऊ दळवी घर ते सुरेश लोणकर घर काँक्रीट रस्ता गटारावर काम करणे 30 लाख रुपये
अशा प्रकारे दोन कोटी रुपयांचा निधी नगर विकास खात्याकडून वैशिष्ट्यपूर्ण नगर विकास निधीतून मंजूर करण्यात आला आहे

करमाळा शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचा 15 कोटी रुपये व करमाळा बायपास मौलाली माळ सात नळाच्या विहिरीच्या बाजूने थेट पुणे रस्ता या बायपास मंजूर रस्त्यासाठी बारा कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत लवकरच या काम संदर्भात मंत्रालयात बैठक होणार आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे

कामे दर्जेदार करा
प्राध्यापक शिवाजीराव सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला निधी चा वापर योग्य प्रकारे करावा सदृ रस्त्याचे गटार बांधकामाची कामे उच्च दर्जाची इस्टिमेट प्रमाणे करावी ठेकेदारावर लक्ष देऊन चांगल्या दर्जाची कामे करून घेण्यासाठी शिवसैनिकांनी दक्ष राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुखप्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले

…..

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *