पंचायत समिती करमाळा यांच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये घरकुल बांधकाम आवास सप्ताहाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांच्या हस्ते करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री ज्ञानेशजी पवार ,भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे ,रावगावचे बापूसाहेब पाटील, भाजपा माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर ,श्री सतीश आदलिंग आदिउपस्थित होते..
सदर आवास अभियान कालावधीमध्ये घरकुल लाभार्थ्यांनी स्वतःचे हक्काचे घरावर लाभार्थींनी गुढी उभारून आनंद उत्सव साजरा केलेला आहेआवास अभियान कालावधीमध्ये 62 घरकुलाचे करारनामे ,पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजना अंतर्गत पाच घरकुल लाभार्थ्यांनी जागा खरेदी केली,
तसेच छत्तीस घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता ,79 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, 55 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता 15 लाभार्थ्यांना चौथ्या हप्ता असे एकूण 77 लाख 70 हजार रुपये एवढे अनुदान घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले आहे
तसेच सदर आवास सप्ताहामध्ये बावन घरकुल लाभार्थींना हक्काचे घर मिळाल्याची माहिती गट विकास अधिकारी श्री राऊत यांनी दिले करमाळा पंचायत समितीच्या वतीने सायन्स वॉल उपक्रम ,दारू सोडा पाल्यांना शिष्यवृत्ती मिळवा अभियान, एमपीएससी- यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा योजना अभियान, अभ्यासिका अशा उपक्रमाचे जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांनी कौतुक केले…