जेआरडी माझा करमाळा

गुढीपाडवा ते रामनवमी दिनांक 22/03/2023 ते दिनांक 30/3/2023 या कालावधीत घरकुल आवास सप्ताहाचे आयोजन करण्यात यावे.असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, केंद्र पुरस्कृत योजना – ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत योजना – ग्रामीण अंतर्गत आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गुढीपाडवा ते रामनवमी दिनांक 22/03/2023 ते दिनांक 30/3/2023 या कालावधीत घरकुल आवास सप्ताहाचे आयोजन करण्यात यावे.
सदर आवास सप्ताहामध्ये घरकुल लाभार्थींचे मेळावे ग्रामपंचायत निहाय मा. सरपंच यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात यावेत. घरकुल लाभार्थी यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने लाभार्थी निहाय नियोजन करण्यात यावे तसेच घरकुल लाभार्थींचे करारनामे बाकी असतील त्यांचे तात्काळ करारनामे करावेत, करार झालेल्या लाभार्थींचे पाया भरणी संबंधीचे बांधकाम साहित्य जमा करणेस सहकार्य करावे. तसेच ज्या घरकुल लाभार्थींचे बांधकाम सुरू होऊन लिंटेल पर्यंत काम पूर्ण झालेले आहे. अशी सर्व घरकुले अभियान कालावधीमध्ये म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत तात्काळ पूर्ण करून सदर घरकुलावर गुढी उभारून गृहप्रवेशाच्या आयोजन करण्यात यावे. जेणेकरून घरकुल लाभार्थींना स्वतःच्या नवीन घरकुलावर गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करता येईल. सदर अभियान कालावधीत मा. सरपंच यांचे मार्गदर्शनाखाली अभियान यशस्वी होण्याकरिता संबंधित ग्रामपंचायत स्तर व पंचायत समिती घरकुल विभाग स्तर यांनी सर्वतोपरी सहाय्य करून आपले योगदान देतील अशी मी आशा करतो.
धन्यवाद !!
आपल्या हक्काच्या घरावर गुढी उभारण्यासाठी सर्व लाभार्थी ना शुभेच्छा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांना माहितीसाठी दिले आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *