केम गावच्या विकासाकरिता निधी कमी पडु देणार नाही: आमदार संजयमामा शिंदे

केम प्रतिनिधी
चालु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रोपळे- केम- वडशिवणे- कंदर करिता १ कोटी रू, निंभोरे – केम- दहीवली- वेणेगाव ३ कोटी रू,तसेच केम- ढवळस- पिंपळखुटे – अंबड रस्ता २ कोटी मजुंर करण्यात आला असल्याचे संजयमामा शिंदे यांनी सांगितले
आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून श्री उत्तरेश्वर मंदिर पुल ते बाह्य वळण रस्ता -पारखे वस्ती पर्यंतचा दोन पदरी सिमेंट काँक्रेट रस्ता( 2 कोटी) तसेच नागोबा गल्ली येथे श्री नागनाथ मंदिर सभामडंप(७.३५ लाख), देवकर(म्हेत्रे) वस्ती येथे युवकांना व्यायामा करता व्यायामशाळा इमारत(७.३५ लाख), केम- बिचितकर वस्ती नं१ रस्ता डांबरीकरण (२५ लाख) व दोंड वस्ती ( वाघोबा कडील) हनुमान मदिंर सभामडप (७.३५ लाख) व विठ्ल मंदिरामध्ये सभामंडप ( १० लाख रु) अश्या प्रकारचा निधी आतापर्यंत मंजूर करण्यात आला आहे.
असे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे, यामुळे केम व पंचक्रोशीतील ग्रामस्थाकडुन आमदार संजयमामा शिंदे यांचे विशेष कोैतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *