श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी पक्षांसाठी चारा पाण्याची सोय

केम- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी आज विविध पक्षांसाठी चारा पाण्याची सोय करण्यात आली. यावेळी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे जलपात्र व धान्यपात्र तयार करून आणले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेशआबा तळेकर हे उपस्थित होते. यावेळी पै. मदनतात्या तळेकर, शालेय समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर , शालेय समिती सदस्य श्री सचिन रणशिंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री एस.बी. कदम हे उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमात प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांनी या नवोपक्रमामागील भूमिका सांगितली. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. वेगवेगळ्या पक्षांना चारा पाणी मिळत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या झाडावर वेगवेगळ्या पक्षांसाठी श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले पाण्याचे जलपात्र व धान्यपात्र विद्यार्थ्यांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या मदतीने बांधण्यात आले.या जलपात्र व धान्यपात्र मध्ये पक्षांसाठी चारा व पाणी ठेवण्यात आले. यावेळी येथील विद्यार्थ्यांना आपापल्या घराच्या गच्चीवर देखील पक्षांसाठी चारा व पाण्याची सोय करून काळजी घेण्याचे सांगितले.
या कार्यक्रमास प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे,प्रा.संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे , प्रा.सतीश बनसोडे व ज्युनिअर कॉलेजचे इयत्ता अकरावीचे विद्यार्थी उपस्थित होते. निसर्ग आणि मानव यांच्यातील नातेसबंध दृढ करणार्‍या या उपक्रमाचे पंचक्रोशीमधे कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *