करमाळा प्रतिनिधी
आत्मनिर्भर होण्याचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिला त्यांच्याच पावलावर पावुल ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विकास कामाचा धडाका लावला आहे यावरून निश्चित राज्यही आत्मनिर्भर झाल्याशिवाय राहणार नाही असे मत नुकतेच भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्या सोलापूर जिल्हा सहसंयोजक पदी निवड झाल्यानंतर अमरजीत साळुंखे यांनी सत्कारास उत्तर देताना भावना व्यक्त केली
केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत त्या सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे समन्वय महत्त्वाचे होते आणि दोन्हीकडे एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, वंचित घटक यापर्यंत सर्वच योजना पोहचल्या तर निश्चितच व्यक्ती आत्मनिर्भर झाल्याशिवाय राहणार नाही
माझ्या पदाच्या माध्यमातून कटकरी, शेतकरी ,शेतमजूर ,महिला दिव्याग त्यांच्यासाठी शासनाचच्या विविध योजना आहेत त्या पोहोचविण्यासाठी निश्चित प्रयत्न करू अनेक योजना जाहीर होतात परंतु त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीत यासाठी आपण गावोगावी जाऊन प्रबोधन करून येणाऱ्या अडचणी दूर करू
यावेळी त्यांचा सत्कार भाजपा माजी शहराध्यक्ष संजय अण्णा घोरपडे तसेच प्रदीप देवी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर ,राष्ट्रीय समाज पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, प्रवीण होगले, अक्षय दळवी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संतोष कांबळे ,रुपेश पाटील आदी उपस्थित होते…