केम गावातील श्री उत्तरेश्वर महाराज देवस्थान यात्रेनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने ग्राम स्वच्छता अभियान
केम प्रतिनिधी
महाराष्ट्र माजी राज्य मंत्री वंदनीय बच्चू भाऊ कडू यांच्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा वसा घेत प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील व शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी आज एक वेगळाच आदर्श निर्माण करत अतिशय भव्य अशा श्री उत्तरेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त,कौतुकास्पद काम करत भाऊंच्या च्या पावलावर पाऊल ठेवत संपूर्ण दिवसभर केम गाव व मंदिर परिसराची स्वच्छता करून एक वेगळाच आदर्श घालून दिला.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील महाराष्ट्र मध्ये केम हे गाव कुंकू साठी प्रसिद्ध आहे या गावांमध्ये साधुसंतांची रंगभूमी म्हणून मानली जाते. या गावांमध्ये श्री उत्तरेश्वर मंदिर ग्रामदैवत म्हणून मानले जाते,आजू बाजू गावातील भक्तजन या देवाला श्रद्धा स्थान मानतात केम गावातील पंचक्रोशीतील या देवाचे श्रद्धा ठेवतात प्रसिद्ध ऐतिहासिक स्थान म्हणून या ग्राम देवताची ओळख आहे या देवाची यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरली जाते,श्री उत्तरेश्वर देवस्थान मंदिरातील परिसर स्वच्छ यात्रेनिमित्त संत गाडगेबाबा महाराज ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत प्रहार संघटना करमाळा तालुक्यातील आमचे प्रहार सैनिक श्री उत्तरेश्वर हायस्कूल मधील विद्यार्थी शिक्षक वर्ग ,केम पंचक्रोशीतील युवक वर्ग, सामाजिक ,राजकीय नागरिक व्यापारी ,देवस्थान ट्रस्ट,करत आहेत.
यावेळी प्रहार सैनिक उपस्थित होते तसेच भाजप तालुका उपसरचिटणीस धनंजय ताकमोगे सामाजिक युवा अध्यक्ष सचिन रानशिंगारे पै मदन तात्या तळेकर ,गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकही उपस्थित होते.