नंदन प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, समतेचे राज्य घडवणारे न्यायप्रिय बहुजन प्रतिपालक, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती नंदन प्रतिष्ठान च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शहरातील संताजीनगर येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया,सामाजिक कार्यकर्ते जयंत दळवी,शिवसेना उपशहरप्रमुख पंकज परदेशी,भीम दलचे सुनिल भोसले,अर्बन बँकेचे प्रकाश क्षिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचे शिवपूजन करून महाराजांच्या जीवनाविषयी मनोगत व्यक्त करण्यात आले.

जय जिजाऊ जय शिवराय या घोषणेने परिसर लक्ष वेधत होता.

यावेळी संजय गांधी निराधार चे नरेंद्र ठाकूर,महेश मुकणे,अमोल ननावरे,रोहित कोळेकर,दिपक देवकर,आश्विन जव्हेरी,देवकाते सर,महेश क्षिरसागर,संजय जमदाडे यांच्यासह अनेक मित्र परिवार उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *