श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या आग्रहामुळे कारखान्यावर आलो – हरिदास डांगे
कमलाई नगरी
कारखान्याचे हित लक्षात घेऊन ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना कर्मचारी यांच्या आग्रहा खातीर मी कारखान्यावर आलो आहे अशी माहिती श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे प्रमुख हरिदास डांगे यांनी सांगितले आहे. कारखाना उत्तम चालावा यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करित आहोत मा आ नारायण पाटील, संचालिका रश्मी दिदी बागल यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. तसेच सर्व कर्मचारी काम बंद करून मला भेटायला आले होते त्यांना काम बंद करू नका काम चालू ठेवा मी कारखानास्थळावर येतो असे समजून सांगितले आहे त्यांच्या सर्वांच्या आग्रहामुळे मी कारखाना स्थळावर आलो आहे लवकरात लवकर कारखाना कसा चालू करता येईल यासाठी प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत असे डांगे यांनी सांगितले आहे.
….
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चालावा म्हणून बागल,पाटील गटाचे सर्व जण आम्ही प्रयत्न करित आहोत.ऊस उत्पादक शेतकरी, वाहन धारक,कर्मचारी हेच खरे कारखान्याचे तारणहार आहेत लवकर कारखाना सुरळीत चालेल – चेअरमन धनंजय डोंगरे, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना,
…..
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना व कर्मचारी संघटनेचे हित हरिदास डांगे सो यांनी जोपासले आहे त्यांच्या शब्दामुळे आम्ही कारखाना कर्मचारी कामकाज करीत आहे कारखाना सुरळीत चालण्यासाठी राजकीय जोडे नेते मंडळींनी काही काळ बाहेर ठेवावेत – कर्मचारी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना, करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *