
सोलापूर प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सोलापूर यांच्या वतीने सरल मन सरल जीवन या विषयावर आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या आणि राजयोग शिक्षिका बी के शिवानीदीदी यांचे मुख्य प्रवचन गुरूवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती बी के प्रदीपभाई शिंगवी, बी के प्रज्ञादीदी, बी के अनितादीदी, डॉ. नंदा भट्टड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक असून सर्वांसाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आल्याचे तसेच हा कार्यक्रम वेळेवर सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
मनाला शांती, जीवनाला समृध्द बनवण्यासाठी आध्यात्माची गरज निर्माण झालेली असताना योग्य व्यासपीठ आणि मार्ग मिळत नाही हेच ओळखून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सोलापूरच्या वतीने सरल मन सरल जीवन या

विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या जगात ताणतणाव वाढत असताना प्रत्येक मनुष्याला मनःशांती,जीवन आनंदी ठेवण्यासाठी आणि समाधानासाठी मोठे आव्हान निर्माण झाले असताना विचार सकारात्मक आणि आध्यात्मिक दृष्टीकोनाची प्रेरणा देणारा ईजी माईंड ईजी लाईफ या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या, राजयोग शिक्षिका बी के शिवानीदीदी या सहभागी होवून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. मनातील नकारात्मक विचारावर मात करून शांत, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा त्यांच्या मार्गदर्शनातून मिळणार आहे. मनःशांती,तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार, भावनिक बुध्दीमत्ता, स्व व्यवस्थापन, नातेसंबधातील सुसंवाद, कर्मसिध्दांत,आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आत्मपरिवर्तन अशा विविध विषयावर बी के शिवानीदीदी या आध्यात्मिक प्रेरणादायी

मार्गदर्शन करणार आहेत. असेही यावेळी सांगण्यात आले. हा कार्यक्रम गुरूवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते रात्री 8 या वेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमासाठी या संकेतस्थळावर पूर्वनोंदणी आवश्यक असून नोंदणी झाली नसली तरी सर्वांसाठी हा कार्यक्रम मोफत ठेवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी 8669163372 किंवा 7774998877 या नंबरवर संपर्क करावे आणि कार्यक्रमाला मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यावेळी बी के पूनमदीदी, बी के शिवराजभाई मजगे उपस्थित होते.
मेडिटेशनसाठी तीन दिवसीय शिबीर
दि.20,21 आणि 22 नोव्हेंबर 2026 या तीन दिवशी सकाळी 7 ते 8 आणि सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत शिवछत्रपती रंगभवन या ठिकाणी मेडिटेशनचा जादुई प्रभाव हे तीन दिवसीय शिबीर घेण्यात येणार आहे. यामध्ये बी के डॉ.दामिनीदीदी या मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरालाही सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असेही यावेळी सांगण्यात आले.