श्री आदिनाथ साखर कारखान्याचा रुपये २३५० चा पहिला हप्ता- चेअरमन धनंजय डोंगरे
करमाळा- श्री आदिनाथ साखर कारखाना चालू गळीत हंगामामध्ये गाळपासाठी येणाऱ्या ऊसासाठी रुपये २३५० प्रतिटन पहिला हप्ता देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सांगितले आहे. आदिनाथ साखर कारखान्याची संचालक मंडळ सभा बुधवार ४ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाली यामध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आदिनाथ हे तालुक्यातील सहकाराचे मंदिर आहे. तालुक्यातील शेतकरी सभासदांनी आदिनाथवर कायम विश्वास ठेवला. यापुढील काळातही आपण शेतकरी आणि वाहतूकदारांचे हित जपण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सांगितले. शेतक-यांच्या काटा पेमेंट सोबतच वाहतूक तोडणीचे काटा पेमेंट स्वरुपातच पेमेंट करण्यात येणार आहे.
ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने सर्व शेती विभागातील कर्मचारी यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत, योग्य प्रकारचे नियोजन केले आहे. त्यामुळे आदिनाथ उशीरा चालू होऊन ही चांगल्या प्रकारे गाळप करेल असा विश्वास डोंगरे यांनी व्यक्त केला.
या संचालक मंडळ बैठकीसाठी कारखान्याच्या मार्गदर्शक संचालिका रश्मी दिदी बागल उपस्थित होत्या. चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. ना. तानाजीराव सावंत सर, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी आमदार नारायण आबा पाटील, शिवसेना (बा) संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत सर, तालुक्यातील सर्व सभासद, वाहतूकदार यांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी करण्यासाठी आम्ही बांधील आहोत असे म्हटले आहे. यावेळी व्हा. चेअरमन रमेश कांबळे, नितीन जगदाळे, संचालक नानासाहेब लोकरे, डॉ हरिदास केवारे, पांडुरंग जाधव, नामदेव भोगे, पोपट सरडे, प्रकाश झिंजाडे, अविनाश वळेकर, रामभाऊ पवार, लक्ष्मण गोडगे, दिलीप केकाण,राजेंद्र पवार, चंद्रहास निमगिरे, कार्यकारी संचालक अरुण बागनवर उपस्थित होते.
कोट
आदिनाथ कारखान्याचे उसदर दर धोरण कारखान्याच्या मार्गदर्शक संचालिका रश्मी दिदी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली 2350 रु देण्याचे ठरले आहे. आज कारखाना स्थळावर या संबंधी संचालक मंडळाची बैठक झाली. ऊस दरासोबतच तोडणी वाहतूक पेमेंट ही रोख स्वरूपात देण्याचे नियोजन केले आहे. या धोरणामुळे शेतक-यांना तसेच वाहतूकदारांचा फायदा होणार आहे. त्यामुळे आदिनाथ उशिरा सुरू होऊन ही चांगल्या प्रकारचे गाळप पूर्ण करेल असा विश्वास आहे…धनंजय डोंगरे, चेअरमन, आदिनाथ सहकारी साखर कारखाना

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *