श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांना सहीचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे तसेच कारखाना कर्मचारी यांनी सकाळी काम थांबवले होते काही कर्मचारी डांगे यांना भेटण्यासाठी गेले आहे तुम्ही कारखान्यावर या त्यांची मन धरणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकार तत्वावर चालावा यासाठी श्री आदिनाथ बचाव समिती स्थापन करून डांगे साहेब यांनी मुंबई पुणे कोर्टामध्ये सतत पाठपुरावा करून कामगार आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सभासद व करमाळा तालुक्यातील जनतेचा हरिदास डांगे यांच्यावर विश्वास असल्यामुळे कमी खर्चामध्ये त्यांनी कारखान्याचे दुरुस्तीचे काम केली हरिदास डांगे यांना सन्मानपूर्वक मान सन्मान देऊन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सहीचा अधिकार देण्यात यावे ऊस दर कामगारांच्या पगार ऊस वाहतूकदारांचे निर्णय घेण्याची अधिकार डांगे साहेब यांना देण्यात यावे आदिनाथ सहकारी साखर कारखाना व्यवस्थित चालण्यासाठी डांगे साहेबांचे मार्गदर्शन व त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सुस्थितीत येऊ शकतो आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने डांगे साहेबांना अधिकार न दिल्यास करमाळा ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल,काही कर्मचारी मा आ नारायण पाटील व रश्मी दिदी बागल यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रा रामदास झोळ, डाँ वसंत पुंडे, व हरिदास डांगे यांनी पुढाकार घ्यावा असेही सांगितले आहे.