उन्हाळी आवर्तनातुन चालू पिकांची जोपासना होणार – युवानेते पृथ्वीराज पाटील
करमाळा प्रतिनिधी
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या रब्बी आवर्तनातुन तालुक्यातील शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचे पिक उत्पादन घेता आले, उन्हाळी आवर्तनातुन चालू पिकांची जोपासना होणार असल्याचे युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. आजपासून सुरू होणाऱ्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे पंप सुरु करतेवेळी ते बोलत होते. दहिगाव येथील पंप हाऊस एक मध्ये आज उन्हाळी आवर्तनासाठी
जेऊरचे सरपंच तथा आमदारपुत्र पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते कळ दाबून पंप सुरु करण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्री आवटे साहेब, शाखा अभियंता श्री सौंदणे साहेब चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, दहिगावचे सरपंच संजय गलांडे, जि प सदस्य बिभीषण आवटे, पं प सदस्य गणेश चौधरी,
माजी सरपंच जोतीराम नरुटे, सोसायटी माजी चेअरमन सुरेश नरुटे, प्रगतशील बागायतदार राहुल गोडगे, शेटफळ उपसरपंच अजित नाईकनवरे, बिभीषण पवार, माजी सरपंच मारुती पवार, भीमराव घाडगे-पाटील, विक्रम पवार,
आदि उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत पाटबंधारे विभागाचे स्टाफ कडून करण्यात आले.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की रब्बी आवर्तन वेळेवर दिल्याने पुर्व भागातील शेतातील गहु, हरभरा, उडीद, कांदा यासह केळी सारख्या नगदी पिकांना जीवदान मिळाले. आमदार नारायण आबा पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतलेल्या खंबीर भुमिकेमुळेच आज या महिनाभरात कुकडी, दहिगाव उपसा सिंचन योजना, मांगी मध्यम प्रकल्प, भीमा सीना बोगदा व सीना माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले. आता उन्हाळी आवर्तनात सुध्दा पुर्व भागातील चारीच्या  तांत्रिक अडचणी नसलेल्या सर्व गावांना पाणी दिले जाणार आहे. शिवाय नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच गुरांच्या चारा टंचाईच्या बाबतीतही या योजनेतुन शक्य तेथे पाणी द्यावे अशी सुचनाही आमदार नारायण आबा पाटील यांनी संबंधित विभागास दिली असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
उपस्थितांचे आभार शाखा अभियंता घोडेस्वार यांनी मानले. उप अभियंता राजगुरू यांच्या देखरेखीखाली व त्यांनी आखलेल्या नियोजनानुसार
हे आवर्तन चालू झाले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *