करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगर परिषद व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ‘सखी मेळावा’ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि.२८ मार्च २०२५ रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आले आहे. यासाठी करमाळा शहरातील महिलांनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सखी मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा. सखी मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम फक्त महिलांसाठीच बंदिस्त व सुरक्षित कार्यक्रम असल्याने यात आपण सहभाग नोदंवावा. श्री गुरुप्रसाद मंगल कार्यालय, दत्तपेठ, करमाळा कार्यक्रम येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, पंचायत समितीच्या कनिष्ठ प्रशासनाधिकारी माधुरी सपाटे, उपजिल्हा रुग्णालयाच्या स. अधिसेविका ज्योती कडूपाटील, अ.भा.ग्रा.पंचायतचे तालुका अध्यक्ष ब्रह्मदेव नलवडे तर प्रमुख उपस्थिती माधुरी दिवाण, लघु पाटबंधारे, करमाळा, प्रिया पाटील उपअधीक्षक, भूमी अभिलेख, करमाळा, अजीम खान तालुका संघटक, अ.भा ग्रा. पंचायत, करमाळा, प्रा. भीष्माचार्य चांदणे साहित्यिक सदस्य, अ.भा.ग्रा.पंचायत, करमाळा, डॉ. कोमल दुधे वैद्यकीय अधिकारी, वरकुटे, गिरीजा म्हस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे, चक्रधर पाटील सदस्य, अ.भा.ग्रा.पंचायत, करमाळा, सर्व कर्मचारी वृंद नगरपरिषद, करमाळा यांची राहणार आहे.

“इच्छुक महिलांनी २५ मार्च २०२५ पर्यंत नाव नोंदणी करावी. सहभाग व नाव नोंदणीसाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा..!”

स्वाती माने – ७३५०२५२६७७, निलिमा पुंडे – ९८६०७३३९२२, सुलभा पाटील – ९८९०८८५८२८, मंजिरी जोशी – ९६८९६९०७१५, माधुरी परदेशी – ९७६३३२७३०६, ललिता वांगडे – ९४२०९१९१४२, निशिगंधा शेंडे- ७८४३००३७९३, सारिका पुराणिक – ९४०४३०९८८६

कार्यक्रमासाठी नोंदणी करणाऱ्या महिला व महिला ग्रुप यांनाच कार्यक्रम सादर करण्यासाठी प्राधान्याने परवानगी देण्यात येईल.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *