आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने
करमाळा ( प्रतिनिधी)- आज दिनांक -१८/०३/२०२५ रोजी आदिनाथ सह. साखर कारखान्याची उमेदवार अर्जाची छाननी प्रक्रीया घेण्यात आली. ऊस उत्पादनाची सलग तीन वर्षाची अट रद्द झाल्याने बहुतांशी सर्वच अर्ज वैध ठरविण्यात आले. ऊस उत्पादक मतदार संघासह, महिला राखिव, अनु जाती, भटक्या जमाती मतदार संघात कोणीही हरकती दाखल केलेल्या नाहीत मात्र सहकारी संस्था मतदार संघात माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे उमेदवार सुजित बागल व शारदा मोरे यांच्या अर्जावर आमदार नारायण पाटील गटाचे वतीने हरकत घेण्यात आली होती. यावर दोन्ही बाजुकडून विधिज्ञ नेमण्यात आले होते. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकुन.. निवडणुक निर्णय अधिकारी श्री अमोलसिंह भोसले यांनी सायंकाळी उशिराने निर्णय पारित केला असुन यामधे हरकती फेटाळत श्री सुजित शिवाजी बागल व सौ शारदा मोरे यांचे दोन्ही अर्ज मंजुर केले आहेत. याबाबत उमेदवार सुजित बागल यांचेशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आदिनाथ साखर कारखाना हा फक्त माजी आमदार संजयमामांच्या नेतृत्वातच चांगला चालु शकतो. आमदारांनी आमचेवर चुकीची व बेकायदेशीर हरकत घेतलेली होती परंतु ती फेटाळली आहे. ह्यातच आमचा नैतिकतेचा विजय झालेला असुन, आदिनाथचे सर्व सभासद, कामगार निश्चितपणे आमचे गटाचे पाठीशी राहतील याची खात्री असल्याचे सांगितले.
