कुंभेजमधे साजरी होणारी ईद सामाजिक ऐक्याचे अनोखे उदाहरण
— दिग्विजय ( प्रिन्स ) बागल

करमाळा प्रतिनिधी

कुंभेज येथील ज्योतिर्लिंग मंदिरात आयोजित शिरखुर्मा मेजवानी प्रसंगी अनौपचारिक संवाद साधताना दिग्विजय बागल म्हणाले की कुंभेजमधे साजरी होणारी ईद सामाजिक ऐक्याचे अनोखे उदाहरण असून हा आदर्श अन्य गावानी अनुकरण करावा असा आहे.
स्व. लोकनेते दिगंबरराव बागल हे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री असताना वंचित व अल्पसंख्यांकांचे प्रश्न सोडवण्यास त्यांनी कायम प्राधान्य दिले. सर्व धर्मीयांच्या पाठीशी खंबीर उभे राहून हाच समतेचा विचार बागल कुटुंबीय आजही जपत आहे.
कुंभेजच्या पठाण, शेख कुटुंबीयांकडून साजरी केली जाणारी ईद ही आगळी वेगळी असून सर्व समूदायाना सोबत घेऊन आनंद साजरा केला जात आहे यातून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जात आहे .सर्व धर्मीय मित्रपरिवार मंदिरात शिरखुर्म्याचा आनंद घेतात हे अनोखे उदाहरण असल्याचे बागल म्हणाले.
कुंभेज येथील पैगंबर पठाण, अमीन पठाण आणि आदम मकबूल शेख परिवार मागिल पाच वर्षांपासून ज्योतिर्लिंग मंदिरात सार्वजनिक स्वरूपात रमजान ईद आणि शिरखुर्म्याचा आनंद सर्वधर्मीयांसोबत एकत्र येऊन साजरा करत आहेत . याप्रसंगी पठाण कुटुंबियांकडून शिवसेना नेते दिग्विजय बागल यांना सन्मानित करण्यात आले.

 यावेळी  कुंभेजचे मा. सरपंच गोकुळ शिंदे, बाबा शिंदे, सुरेश शिंदे, महादेव शिंदे, राजेंद्र शिंदे. कल्याणराव साळुंके, संतोष शिंदे, दिलीप पवळ,अशोक पवळ, बलभीम पवळ, वाघमारे पो.हवालदार, पैगंबर पठाण, अमीन पठाण, आदम शेख,  ज्ञानेश्वर शिंदे, विशाल चौगुले, दादा जाधव, संतोष घोरपडे, आश्रु तोरमल, किसन शिंदे, किशोर कदम,, सचिन शिंदे, तानाजी चांदणे, रविंद्र पवळ, . सोमनाथ पवळ  तसेच कुंभेज मधील बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *