करमाळा प्रतिनिधी

वीट ग्रामपंचायत उपसरपंच निवड दिनांक २५/१/२०२५ रोजी पार पडली. पूर्वीच्या उपसरपंच नंदा अंकुश जाधव यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पुढील निवडी प्रसंगी हेमंत बाबुराव आवटे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध पार पडली.

या निवडी प्रसंगी सोलापूर जिल्हा दूध संघाचे मा. व्हॉ.चेअरमन राजेन्द्रसिंह शंकरराव राजेभोसले, तात्यासाहेब जयवंत जाधव, दिगंबर बाप्पू गाडे, शांतीलाल जाधव, कांतीलाल चोपडे, बाळासाहेब गाडे, पांडुरंग जाधव, बिबीशन नाना आवटे, मधुकर जनार्दन गाडे, आनंदकुमार (देवा) ढेरे, संतोष (आबा) मधुकर ढेरे तसेच ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह राजेभोसले, महादेव जाधव गुरुजी, जगदीश निंबाळकर, गणेश ढेरे, धनसिंग भोंग, विशाल गणगे, अंकुश जाधव आणि सुभाष आवटे, सुभाष जाधव, हरिश्चंद्र आवटे, गणेश जाधव, तात्यासाहेब जाधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच महेश गणगे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुदळे भाऊसाहेब यांनी कामकाज पार पाडले. ही निवडणूक झाल्यानंतर नेते राजेंद्रसिंह तात्या राजेभोसले यांनी नूतन उपसरपंच हेमंत आवटे यांचा सन्मान करून हार्दिक अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *