
करमाळ्यात शिवसेना युवा सेनेच्या वतीने हजारो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी संपन्न
करमाळा प्रतिनिधी :- करमाळयातील शिवसेना युवा सेनेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी शिवसेनेसह संपूर्ण सावंत परिवार त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी ठामपणे उभा राहिल असे प्रतिपादन वाकाव चे सरपंच तथा युवा नेते ऋतुराज शिवाजी सावंत यांनी करमाळा येथे केले. करमाळा शिवसेना युवा सेनेच्या वतीने बायपास रोडवरील युवा सेना मध्यवर्ती कार्यालयासमोर वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचे उद्घाटन प्रसंगी त्याप्रसंगी सावंत बोलत होते. सदरचा कार्यक्रम युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, उप तालुका प्रमुख श्रीकांत गोसावी, शहर प्रमुख विशाल गायकवाड, उपशहर प्रमुख अनिकेत यादव आदिनी घेतला होता.
यावेळी शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे आयोजन केलेले होते. सदर शिबीरामध्ये हजारो वारकऱ्यांनी सहभाग नोंदवत आरोग्य तपासणी करून घेतली तसेच त्यांना यावेळी मोफत औषोधोपचार देण्यात आले. आषाढीवारी च्या निमीत्ताने पंढरपूरला जाण्यासाठी करमाळा शहरात हजारो पायी दिंडया येत असतात म्हणून आम्ही या शिबीराच्या आयोजनासोबत अल्पोपहाराचे ही आयोजन केले होते. करमाळयात आलेल्या वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होवू नये म्हणून आम्ही प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात जावून प्रशासनाने केलेल्या सुविधांचा प्रत्यक्षपणे आढावा घेतला होता. करमाळयातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सक्षमपणे यंत्रणा उभा करून वारकऱ्यांना सर्वतोपारी सहकार्य केलेले असून करमाळा वासियांनीही सर्व छोटया मोठया दिंडयांचे मनापासून स्वागत केल्याने आलेले वारकरी समाधान व्यक्त करताना पहायला मिळाले. यापुढेही शिवसेना युवा सेनेच्य वतीने असेच सामाजिक उपक्रम राबवित शिवसेनेच्या 80टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे धोरण अवलंबून कार्यरत राहणार असल्याचे पदाधिकारी यांनी सांगितले.
सदरचे शिबीर यशस्वी करण्यासाठी वरकटणेचे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे, सुभाष पाटील, गणेश पवार, मनोज रोकडे, दादासाहेब थोरात, खंडू जगताप, रूपाली शिंदे, आदि पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
