
श्री कमलादेवी मंदिरात दिंडयांचे स्वागत
करमाळा प्रतिनिधी
श्री कमलादेवी दर्शनासाठी श्री कमलादेवी मंदिरामध्ये पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकरी पायी दिंड्यांचे आगमन मंदिरामध्ये होत आहेत.
श्रीसंत कैकाडी महाराज पायी दिंडी श्रीक्षेत्र मनमाड ते पंढरपूर या पायी दिंडीचे स्वागत
श्री कमलादेवी मंदिर समिती पदसिद्ध विश्वस्त तथा करमाळा तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी मंदिरामध्ये स्वागत केले. यावेळी श्री संत कैकाडी महाराज पायी दिंडी श्री शेत्र मनमाड दिंडीचे रघुनाथ महाराज तुळशीराम कारभारी प्रवीण शिंदे वाल्मीक महाराज उपस्थित होते तसेच यावेळी मंदिर समिती विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर व्यवस्थापक अशोक गाठे हनुमंत पवार मंदिर पुजारी रोहित पुजारी सचिन सोरटे धनंजय सोरटे व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
