खासदार भास्करराव भगरे यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वारे यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

करमाळा प्रतिनिधी

दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे (सर) यांची करमाळा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान तालुकाध्यक्ष संतोष (भैय्या) वारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

भगरे सर हे सुद्धा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष होते. संतोष वारेंचे व त्यांचे पूर्वीपासून घनिष्ठ संबंध आहेत. दिल्ली येथे खासदार शपथ विधीला गेल्यानंतर भगरे सरांची व वारेंची भेट झाल्यानंतर सरांनी सांगितले होते की, मी पुढील आठवड्यात पंढरपूरला दर्शनाला जाणार आहे. त्यावेळी तुमच्या घरी आवर्जून भेट देईल. असे दिलेल्या वाचनाला जागणारे भगरे सर आहेत. घरी राजकीय, सामाजिक विषयावर तासभर चर्चा झाली व चहा नष्ट घेतल्यानंतर करमाळा शहरात सर्व दिंड्यांना भेटी दिल्या.

त्याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष वारे,जि प सदस्या राणी वारे , कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप, जिल्हा उपाध्यक्ष चवरे, युवक तालुकाध्यक्ष केशव चोपडे, युवक शहराध्यक्ष अमीर तांबोळी, किसान सेल ता. अध्यक्ष सचिन नलवडे, त. सरचिटणीस समाधान शिंगटे, योगेश सोरटे, संतोष लाड, आरशान पठाण, अमोल सरवदे, अजहर पठाण, दादा कदम, श्रीकांत ढवळे, ऋषी होगले आदि उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *