करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, दिग्विजय बागल किंवा इतर कोण ? होणार तालुक्याचा बेताज बादशाह यासंदर्भात आपापल्या नेत्यांसंदर्भात दिलेल्या समर्थकांनी प्रतिक्रिया
देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्यामुळे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा विजय होणार आहे. बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या विकास कामे या सरकारच्या काळात झाली नाही आदी समस्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. शेतकऱ्यांचा राजा म्हणून शरद पवार यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्यावर विश्वास ठेवूनच मा. आमदार नारायण पाटील हे विजयी होतील – संतोष वारे (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, ता. करमाळा)
पुर्वी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन स्व. डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांनी आमदार संजयमामा शिंदे हे विकास कामासाठी महत्त्व देतात तालुक्याचे व्हिजन लक्षात यांना मोलाचे सहकार्य करावे असे सांगितले होते. त्यानुसार तालुक्यातील नागरीकांनी आमदार संजयमामा शिंदे यांना भरपूर मताधिक्य दिले. त्यांची विजय किती लिडने होणार तेच पाहायचे आहे – अजिंक्य जाधव पाटील (तरटगाव ता. करमाळा)
स्व. दिगंबरराव बागल यांचे जुने सहकारी यांनी या निवडणुकीत खूप मदत केली आहे,युवकांची साथ तसेच लाडकी बहीण महिला भगिनींनी खुप दिग्विजय बागल यांना सहकार्य केले आहे. फक्त अठ्ठावीस दिवसात फिनिक्स सारखी झेप बागल यांनी घेतली आहे. त्यांचा विजय निश्चित होणार आहे – विजय लावंड (करमाळा)
करमाळा विधानसभा मतदारसंघातील कुठलीही विकास कामे झाली नाही तसेच शरदचंद्र पवार, माजी आमदार जयवंतराव जगताप, सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांच्या सहकार्याने मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील यांचा विजयाचा मार्ग सुखकर झाला आहे – देवानंद बागल (मा. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, करमाळा)
आमदार संजय मामा शिंदे यांचा गेल्या 5 वर्षात जाहिरातबाजीपेक्षा कामावर जास्त जोर दिसून आला, सर्वसामान्य घरातील कोणताही कार्यकर्ता त्यांना सहज भेटू शकतो आणि कोणतेही काम करून घेऊ शकतो. संजयमामा शिंदे हे मतदारसंघात केलेल्या सततच्या विकासकामांमुळे निवडून येतील यात शंका नाही. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी करमाळा तालुक्यात 3000 कोटींपेक्षा जास्त निधी आणला त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे – अभिषेक आव्हाड (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सोलापूर)
महायुती सरकारच्या विविध योजनाचा लाभ अनेक घटकांना झाला आहे, तसेच लाडकी बहिण योजनेच्या महिलांनी दिग्विजय भैय्या बागल यांनाच विजयी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्याचा नक्कीच फायदा आम्हाला होणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर सर्व सामान्य जनता खूष आहे. याशिवाय महायुतीचे सर्वच घटक पक्षाचे नेते यांनीही तन मन धनाने काम केले आहे. त्यामुळे विजय आमचाच निश्चित आहे – सतीश नीळ पाटील (संचालक श्री मकाई सह. साखर कारखाना)