आ संजयमामांमुळे तालुक्यातील दुष्काळ संपला – अध्यक्ष किरण फुंदे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका दुष्काळी भाग बोलले जात होते आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नामुळे आता तालुक्याचा दुष्काळ संपला आहे अशी माहिती करमाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा सरपंच किरण फुंदे यांनी दिली आहे.
करमाळा तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची योजना असलेल्या कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन/बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध व्हावा यासाठी या योजनेचे जनक आ.संजयमामा शिंदे यांचा सन 2022 पासून पाठपुरावा केला होता आज त्यांना अखेर यश आले आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे तालुका हरितक्रांतीच्या दिशेने जात आहे आमदार संजयमामा शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे हे झाले आहे शेतकऱ्यांची मुले कामासाठी पुण्याकडे व इतर शहरात जात होती आता शेतकऱ्यांच्या मुलांना पुणे शहराकडे न जाता करमाळ्यातच उत्तम अशी शेती करता येणार आहे.महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व आमदार संजयमामा शिंदे यांचे गावागावातून ग्रामस्थ सरपंच शेतकरी त्यांचे आभार मानत आहे व या निर्देशांचे जल्लोष साजरा करीत आहेत असे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा सरपंच किरण फुंदे यांनी सांगितले आहे