करमाळा प्रतिनिधी

दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला आयडियल स्कूल अॅन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं. १ चा इयत्ता १० वी चा निकाल १०० टक्के लागला. सलग १० वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. प्रशालेचे यशवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे सायली भैरवनाथ झोळ:- ९५.२०%, रिद्धी भाऊसाहेब चोरमले:-८९.४०%, भाग्यश्री माधव बंडगर:- ८८.४०%.

वाशिंबे केंद्रात सायली भैरवनाथ झोळ ९५.२० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. सायली भैरवनाथ झोळ या विद्यार्थ्यीने गणित व विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात १०० पैकी ९८ मार्क मिळवले. रिद्धी भाऊसाहेब चोरमले या विद्यार्थ्यीने हिंदी विषयात १०० पैकी ९५ गुण व मराठी विषयात १०० पैकी ९३ गुण मिळवले.

प्रशालेचे तब्बल ९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले. या यशासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शना बरोबर दर महिन्याला टेस्ट सिरीज, गेस्ट लेक्चर, पेपर संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन केले जाते.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ सर, उपाध्यक्ष राणादादा सुर्यवंशी, सचिवा माया झोळ मॅडम, स्कूल डायरेक्ट नंदा ताटे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर, स्कूलचे प्राचार्य विजय मारकड सर, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *