करमाळा प्रतिनिधी

जिज्ञासा अकादमी व विचारधारा, अहमदनगर आयोजित सावित्री उत्सव 2023 राज्यस्तरीय “काव्यस्पर्धा” आयोजित केली होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवी आदरणीय चंद्रकांत पालवे, कवयित्री शर्मिला गोसावी आणि स्पर्धा प्रमुख कवयित्री

सुरेखा घोलप यांनी जबाबदारी पार पाडली आहे. राज्यभरातून आलेल्या कवितेतून परीक्षकांनी खालील कविंच्या कवितांची निवड केली आहे. यात मला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व 2000 रुपये रोख असे पारितोषिकाचे स्वरुप आहे.

निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक दादासाहेब सुभाष पिसे (करमाळा) विषय – माय सावित्री, द्वितीय क्रमांक वर्षा वसंतराव लगडे (लातूर) विषय – सावित्रीबाई आमच्यासाठी, तृतीय क्रमांक स्वाती किशोर अहिरे (चास) विषय – सावित्रीने घडविले, उत्तेजनार्थ अनुष्का पंडित, विषय – मी सावित्री बोलते, वेदिका दैठणकर (अहमदनगर) विषय – हक्क.

गुणवंत कवी पुरस्कार उपेंद्र निकाळजे, सुजाता पुरी, मनीषा गायकवाड–पटेकर, सुनील राऊत, दशरथ शिंदे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *