
करमाळा प्रतिनिधी
श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजकाने श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या सहा महिन्यांपासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे,

सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून एन.पी. इन्फास्ट्रक्चर प्रा.लि.पुणे. चे मालक नितीन पुरुषोत्तम तापडिया यांच्या कडून देणगी रुपये १०००००/~(एक लाख रुपये फक्त)

धनादेश ने प्राप्त झाली आहे. या निमित्त त्यांचा सत्कार विश्वस्त सुशिल राठोड, व्यवस्थापक अशोक गाठे, लक्ष्मण हवलदार प्रविण हिरगुडे, यांनी सत्कार केला. यावेळी तापडिया यांचे सहकारी सतीश भुकन, लष्कर उपस्थित होते. या निमित्ताने

श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णोद्धार कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.संपर्क अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४
