
करमाळा प्रतिनिधी
ATSE -2024 या राज्यस्तीय प्रज्ञाशोध परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत इरा च्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश प्राप्त केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारी चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे

याही वर्षी गुणवत्ता यादीत घवघवीत यश संपादित केल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे हार्दिक अभिनंदन. प्रशालेतील ATSE परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे इ. पहिली सरडे आराध्या समाधान केंद्रात 1 ली, जिल्ह्यात 7 वी,

राज्यात 10 वी, गुंड स्नेहल समाधान केंद्रात 2 री, जिल्ह्यात 15 वी, राज्यात 18 वी, इ. दुसरी गव्हाणे सुहानी सुरेश जिल्ह्यात 2 री, राज्यात 9 वी, इ. तिसरी लबडे आरव गणेश जिल्ह्यात 4 था, राज्यात 11 वा, गुंड श्रेया सोमनाथ जिल्ह्यात 5 वी,

राज्यात 12 वी, बारकुंड माही ब्रिजेश केंद्रात 1 ली, जिल्ह्यात 13 वी, राज्यात 20 वी, इ. चौथी लबडे अनुष्का सचिन केंद्रात 1 ली, जिल्ह्यात 9 वी, राज्यात 16 वी, तांबोळी रेहान फिरोज केंद्रात 2 रा, जिल्ह्यात 21वा, राज्यात 28 वा ATSE परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, Result १००% लागला आहे .
परीक्षेच्या तयारीसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे, पालकांचे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बारकुंड व मुख्याध्यापक कसबे सर यांनी अभिनंदन केले.