करमाळा प्रतिनिधी
भाजपची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी लोकशाही वाचविण्यासाठी करमाळा तालुक्यात इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व घटक पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. करमाळा येथील हॉटेल राजयोग येथे समविचारी इंडिया आघाडीच्या घटकपक्ष
नेत्यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये करमाळा तालुक्यातील प्रा. रामदास झोळसर, कामगार नेते दशरथ आण्णा कांबळे, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, काँग्रेस आॕयचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप, सुजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार गटाच्या ॲड. सविता शिंदे, तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते शहराध्यक्ष संजय शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी विरोधात
एकत्र येऊन माढा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून इंडिया आघाडीची भूमिका समजावून सांगणार आहोत. भाजपची हुकुमशाही देशांमध्ये वाढत चालली आहे. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून शेतकरी मजूर घटकांना वंचित ठेवण्याचे काम भाजपने करून भांडवलशाहीची निर्मिती केली आहे. सध्या लोकशाही धोक्यात आली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना फसवणाऱ्या लोकांना आपल्याबरोबर घेऊन आपल्या पक्षाचे हित जपण्याशिवाय सामान्य जनतेकडे बघण्यास हे सरकार तयार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून सध्या सक्षम पर्याय म्हणून काम करणार आहोत. भारतात बेरोजगारी शिक्षणाचा प्रश्न बिकट झाला आहे. गरीबांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. भाजप हुकुमशाही करत आहे. विरोधी पक्ष ठेवायाचा नाही घटकपक्षाची तोडमोड करून धमकी देऊन ईडीच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचा काम करत आहेत. यावेळी प्रा. रामदास झोळसर म्हणाले की, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाविषयी सरकारने फक्त दिशाभूल करून समाजाला फसवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लोकशाही जिवंत राहण्यासाठी इंडिया आघाडीची गरज आहे. त्याकरिता जास्तीत जास्त मतदान करून घेणे आवश्यक आहे. करमाळा तालुक्यामध्ये शेतकरी यांची ऊसाची बिले न देणारे त्यांचे नावावर कर्ज काढणारे सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणणाऱ्यांना साखर कारखानदारांना लबाड पुढारी लोकांना बळ देणाऱ्या भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी जनतेने उभा राहणे गरजेचे आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील जनतेला इंडिया आघाडीची भूमिका समजावून सांगण्यासाठी येत्या दोन तीन दिवसात भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.