करमाळा प्रतिनिधी

      यशकल्याणी संस्थेचे मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा उपक्रमासाठी बागल विद्यालयास केले. एकवीस हजार रूपयांचे आर्थिक सहकार्य कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयाने आयोजित केलेल्या एस.एस.सी. परीक्षा मार्च 2024 शुभचिंतन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. करे-पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक

हनुमंत पाटील होते. आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये प्रा.करे पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय्य गाठण्यासाठी शालेय संस्कार महत्वाचे असून माध्यमिक शिक्षणाच्या काळात जीवनाची दिशा ठरवली जाते यासाठी शाळांची भूमिका जबाबदारीची

आहे. समाजाला गुणवान संस्कारी विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षक व अशा शाळांची गरज आहे. कुंभेजचे बागल विद्यालय या बाबतीत विशेष योगदान देत असून ग्रामस्थ व पालकांच्या विश्वास व सहकार्याच्या जोरावर यशस्वी वाटचाल करत आहे असे गौरवोद्गार काढले. यावेळी यशकल्याणी संस्थेतर्फे प्रोत्साहन म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमासाठी विद्यालयास एकवीस हजार रु. मदतीचा धनादेश प्रा.करे- पाटील यांनी मुख्याध्यापकांकडे सुपुर्द केला. यावेळी भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी स्मृती गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. करे पाटील यांचा मुख्याध्यापकांचे वतीने सन्मान

करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थिनी कु. श्वेता पवार, पूजा शिंदे, साक्षी मिसाळ, तृप्ती सातव इ. मनोगत व्यक्त केले व दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी  शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक हनुमंत पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी करीयर निवडताना आवड, क्षमता व संधी या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास येणाऱ्या काळात विद्यार्थी यशस्वी वाटचाल करतील समाजासाठी भरीव योगदान देतील. या कार्यक्रमात मार्च 2023 मधील विद्यालयातील गुणवंत

विद्यार्थ्यांसाठी यशकल्याणी संस्थेतर्फे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 3 हजार, 2 हजार व 1 हजार रूपयांचे रोख पारितोषीक प्रा. करे- पाटील सर व मान्यवरांचे उपस्थितीमध्ये गुनावंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. प्रथम क्रमांक. कु.अंजली राजेंद्र भोसले , द्वितीय क्रमांक कु. निकीता सहदेव सुरवसे, तर तृतीय क्रमांक संदेश सुधीर साळुंके यांना गोल्ड मेडल ,रोख रक्कम व प्रमाणपत्र पालकांसमवेत प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल   मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांचा सन्मान पोलीस पाटील कुंभेज यांचे

वतीने अनिल साळुंके यांनी केला. यावेळी व्यासपीठावर मा.सरपंच महादेव शिंदे, उद्योगपती महावीर साळुंके, शिवस्फूर्ती समूहाचे जिल्हा अध्यक्ष, अनिल कादगे, दै. सकाळचे पत्रकार गजेंद्रजी पोळ, प्रगतशील शेतकरी प्रशांत नाईकनवरे,  उपसरपंच बिभिषण गव्हाणे, अनिल साळुंके, राजेंद्र भोसले. सहदेव सुरवसे, कुमारशेठ कादगे, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, संतोष घोरपडे, किशोर कदम बलभीम वाघमारे नंदकिशोर कांबळे, सावतामाळी

डेकोरेटरचे समाधान रगडे, हर्षद जाधव उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मान्यवरांसाठी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी विठ्ठल मंगल कार्यालय येथे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  प्रतिक्षा कन्हेरे व समिक्षा चांदणे या विद्यार्थिनींनी केले तर भक्ती मुटके हीने उपस्थितांचे आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *