करमाळा प्रतिनिधी

भाजपाचे स्वतःला सर्वात मोठा नेता समजणारा देशाचा गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चांगले विचार मांडत असताना अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या आहेत,  आणि एकच संतापाची लाट उसळली बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या अमित

शहाने आपल्या गृहमंत्री पदाचा तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा या देशातील शिव फुले शाहू आंबेडकर विचाराचे पाईक आणि भीमसैनिक रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलने करतील हे लक्षात घेऊन अमित शहा यांनी माफी मागून राजीनामा द्यावा असे भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी माध्यमांशी बोलताना इशारा दिलेला आहे, अमित शहा यांचा पूर्वीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असणारा तिरस्कार हा आपोआपच बोलताना पोटातून बाहेर निघालेला आहे म्हणून या देशांमध्ये सहनशीलता राखायची असेल तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता आपण तमाम जनतेची माफी मागून ग्रहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, आणि देशातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आपण जनतेची माफी मागून महाराष्ट्र शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा महाराष्ट्रातील जनता आपण केलेल्या विधानाचा चांगला समाचार घेऊन आंदोलने करतील हे आपण गांभीर्याने लक्षात घ्यावे असे भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी बोलताना सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *