करमाळा प्रतिनिधी
झरे गावातील असणारी स्मशानभुमी दुरुस्तीबाबत २०२१ मध्ये जनसुविधा या निधीमधुन दुरुस्तीसाठी निधी मंजुर झाला होता. स्मशानभुमीच्या दुरुस्तीसाठी याच स्मशानभुमीमध्ये सुविधा देण्याबाबत स्मशानभुमी परिसरामध्ये एक हायमास्ट
दिवा तसेच पेव्हर ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत. प्रथमदर्शनी पाहिले असता वापरण्यात आलेला खर्च झालेला निधी पाहिला असता सुशोभीकरण व खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसुन येत असुन यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची शंका येते.
दाखवण्यात आलेला निधी पाहिला तर पाहिजे तसे सुशोभीकण झालेले दिसुन येत नाही. तरी हायमास्ट तसेच पेव्हर ब्लॉक यांचा खर्च पाहता उर्वरित पैशाचा अपहार झाल्याचे दिसुन येते. तरी याची चौकशी करुन संबंधीत विभागातील सर्व
अधिकाऱ्यांची चौकशी होऊन योग्य ती दंडात्मक कार्यवाही व्हावी असा अर्ज सोमनाथ जाधव यांनी गटविकास अधिकारी यांना केला आहे.