करमाळा प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच्या सर्वोच्च पदी बसविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने शिवसंकल्प अभियान राबवले असून प्रत्येक तालुका निहाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित

करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व करमाळा तालुका शिवसेना संपर्क प्रमुख रविंद्र आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा युवा सेना संपर्क कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

यावेळी करमाळा तालुका संपर्क प्रमुख रवींद्र आमले यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी शिवसंकल्प अभियान राबविले असून या

अभियानांतर्गत भव्य दिव्य असा शिवसेना कार्यकर्ता मेळावा पुढील आठवड्यात करमाळ्यात आयोजित करण्याचा आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कार्याची विविध योजनाची माहिती आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून देशाचे नेते नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी या

मेळाव्याचे आयोजन केले आहे. तसेच या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार असून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे आमले यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल पाटील, तालुका प्रमुख देवानंद बागल, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, शिवसेना शहर प्रमुख नागेश काळे, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, उप तालुका प्रमुख प्रशांत नेटके, युवा सेना उप तालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, माजी शहर प्रमुख संजय शिलवंत, राहुल व्यवहारे, महादेव यादव, बाळू आव्हाड, अभिजीत चव्हाण, राजू परदेशी, राजेंद्र काळे, खंडू जगताप, जयदीप पुजारी, अनिकेत यादव, हमुमंत रंदवे, संजय साने, सागर गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *