करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी दिनेश उध्दवराव मडके यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र करमाळा भाजपा कार्यालयात जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते
देण्यात आले. अध्यात्मिक आघाडीचे नूतन तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी अध्यात्मिक क्षेत्रात गेल्या दहा पंधरा वर्षांपासुन नाणीज पिठाचे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या भक्ती संप्रदायाचे काम केले आहे. गेले आठ ते दहा वर्ष जगद्गुरू
नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाचे तालुका अध्यक्ष करमाळा म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. करमाळा तालुक्यातील विविध सामाजिक चळ्वळीत काम करत आहेत. करमाळा तालुकाध्यक्ष कुणबी मराठा समाज सेवा संघ अध्यक्ष
डिजीटल मिडिया पत्रकार संपादक संघटना अध्यक्ष मराठा सोयरिक संघ या संघटनेच्या माध्यमातुन प्रभावीपणे काम करत आहे. देव, धर्म संस्कृतीसाठी भाजपा पक्ष हिंदू धर्म संस्कृती रक्षणाचे काम करत आहे. याला आपण कामाची जोड देऊन हिंदु
धर्म जागरण संस्कृती सर्वंधनासाठी वाढण्यासाठी भाजपाचे ध्येय धोरण भुमीका पटवुन देण्यासाठी भाजपाचे काम करणार असल्याचे सांगितले आहे. या निवडीवेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, भाजपा
ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्रसिंह ठाकूर, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, भाजपा व्यापार आघाडी जि.उपाध्यक्ष बाळासाहेब होशिंग, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सुरवसे, भैय्या कुंभार, संजय किरवे, महादेव गोसावी, गणेश गोसावी यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी बहूसंख्येने उपस्थित होते.