करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार जयवंतराव जगताप व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त शंभूराजे जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य तालुकास्तरीय डान्स स्पर्धा तसेच इतर विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धांचा निकाल घोषित करुन बक्षीस वितरण करण्यात आले.
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, गटशिक्षण अधिकारी राजकुमार पाटील, कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. गुंजकर यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण
करण्यात आले. यावेळी प्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक प्रा.बी.के.पाटील, सुनिता नवले, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. विजय पवार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय भागडे यांनी केले. तर आभार पर्यवेक्षिका नवले यांनी व्यक्त केले.