करमाळा प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी निधी मिळावा याचे निवेदन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मातंग समाजाचे भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष कपिल मंडलिक यांनी दिले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश
भाऊ चिवटे, करमाळा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल उपस्थित होते. यावेळी बाबा करंडे, गणेश आलाट, नितीन आलाट, दयानंद करंडे, विश्व दत्त मंडलिक, विनायक आगलावे, सोनू आलाट, अक्षय आलाट, विश्व राज आलाट, विशाल आलाट, आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.