करमाळा प्रतिनिधी

दिनांक 05/02/24 रोजी सकाळी अकरा वाजता माळशिरस विश्रामगृह येथे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील शेकडो युवक आणि शेतकरी प्रहार जनशक्ती पक्षात सामील झाले.

कार्यसम्राट आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ गावंडे, कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाल यांच्या मार्गदर्शनात, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वात माळशिरस तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी

संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत माळशिरस तालुक्यातील नामवंत डॉ. अमित काळे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह प्रहार मध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांना आपल्या

हॉस्पिटलला मोफत सेवा देणारे आणि नवरात्रीत सलग नऊ दिवस तालुक्यातील भगिनींची मोफत प्रसूती करणारे डॉ. अमित काळे हे बच्चु भाऊंच्या विचाराने प्रेरित होऊन आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्याने प्रभावित होऊन आज आपल्या शेकडो समर्थकांसह प्रहार मध्ये प्रवेश केला.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यांनीही वंदनीय बच्चुभाऊंचा सेवा त्याग समर्पण संघर्ष विचार घराघरात पोहोचवण्याचा यावेळी शब्द दिला.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष मस्के पाटील यांनी तालुक्यातील राजकारण्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत गेल्या पंचवीस वर्षापासून तालुक्यात मंत्रिपद असताना सुद्धा कोणताही विकास तालुक्यातील राजकारणांना साध्य करता आला नाही अशी तोफ डागली. प्रहार च्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक वंचित घटकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी सेवक नगरसेवक आकाश सावंत, राजाभाऊ काळे, अनिल राजकर, रोहन ठवरे,जिल्हा कार्यकारणी सदस्य नाना काळे, चालक-मालक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पवल, सोनू ठवरे, विकास ठवरे, अमोल बुधनवर, ज्ञानदेव कांबळे पाटील, रंजीत हांडे, अण्णा लडकत, गणेश वाघमोडे, अमोल वाघमोडे, माऊली सरगर, संदीप काळे, गुरु करचे तुषार ठवरे, संदीप जाधव, डॉ. तानाजी देवकते, समीर काळजी, राम लोखंडे, आबा खरात, राजाभाऊ ठवरे, अभी लोखंडे, तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *