करमाळा प्रतिनिधी

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना मा. अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांना कारखान्याच्या थकीत कर्ज वसुलीस्तव सामोपचार कर्ज परतफेड बीजना – २०२२ रद्द झाली असल्याने सुपूर्दनाम्याद्वारे दिलेला मालमत्तेचा ताबा बँकेस परत देणेबाबत प्राधिकृत अधिकारी सहाय्यक व्यवस्थापक, पुणे पी. आर. पराते यांनी सुपुर्द नामा नोटीस बजावली आहे.

कारखान्याने थकीत हप्त्यांवरील दंडव्याजापोटी दि.३१.१२.२०२३ अखेर रक्कम रु. १२२.३७ लाखांपैकी कारखान्याकडील अॅप्रोप्रियेशन खाती शिल्लक असलेली रक्कम रु.६५.०० लाख वजा जाता, उर्वरीत रक्कम रु.५७.३७ लाखांचा दि.३०.११.२०२३ पूर्वी भरणा करणेबाबत.

दि.३०.०९.२०२३ अखेरील तडजोड रकमेपैकी थकीत हप्त्यांची देय रक्कम रु.१६२५.४० लाख व दि.३१.१२.२०२३ रोजीच्या हप्त्यातील तडजोड रक्कम रु.३२६.३१ लाख अशी एकूण रु.१९५१.४२ लाख रकमेच्या परतफेडीसाठी योजनेतील तरतूदीनुसार व्याज आकारणी करुन पुढीलप्रमाणे हप्ते देय तारखेस भरणा करणेबाबत.दिनांक३१.१२.२०२३रक्कम (लाखांत)७२२.९८३१.०१.२०२४२९.०२.२०२४६५४.९९६५४.७१

कारखान्याने दंड व्याजापोटीची रक्कम रु.५७.३७ लाख व उपरोक्तप्रमाणे कोणत्याही एकाहप्त्याचा रकमेचा विहीत मुदतीत भरणा केला नाही तर कारखान्यास योजनेअंतर्गत दिलेली सवलत रद्द करण्यात येईल असे कळविण्यात आले.

तसेच बीजनेंतर्गत दिलेल्या तडजोड रकमेच्या परतफेडीच्या नियोजनानुसार दि.०१.०१.२०२४ ते दि. ३०.०९.२०२६ या कालावधीतील त्रैमासिक हप्त्यांची नियमित परतफेड करावयाची आहे.

कारखान्याने तडजोड रकमेपैकी थकीत रकमेच्या हप्त्यांच्या दिलेल्या देय तारखेस भरणा न केल्यास त्याक्षणी शिल्लक असलेल्या साखरसाठ्यासह कारखाना मालमत्तेचा ताबा विनाशर्त शांततापूर्वक मार्गाने राज्य बँकेकडे देण्यात येईल अशा आशयाचे संचालक मंडळाच्या ठरावासह रु. ५००/- च्या स्टॅम्पपेपरवर हमीपत्र पत्र मिळताच सादर करणेबाबत कळविले होते.तसेच कारखान्याने संचालक मंडळाच्या ठरावासह हमीपत्र सादर केल्यानंतरच सामोपचार कर्ज परतफेड योजनेअंतर्गत मुख्य कचेरीकडील पत्रातील अट क्र.३ नुसार दिलेली मुदतवाढ लागू राहील.तरी उपरोक्तप्रमाणे दिलेल्या अटींपैकी आपण कोणत्याही अटीची पूर्तता केलेली नसल्याने कारखान्यास सामोपचार कर्ज परतफेड योजनेअंतर्गत दिलेली सवलत रद्द करुन खाते पूर्वपदावर आणण्यात येत आहे. तसेच आपणांस दि. १४.०९.२०२२ रोजी सुपूर्दनाम्बाद्वारे दिलेला मालमत्तेचा ताबा घेणेसाठी दि. २१.०२.२०२४ रोजी सकाळी ११.३० वा. नियोजित करण्यात आली आहे. तरी भाडे करारातील अट क्र.८ नुसार विनाशर्त शांततापूर्वक मार्गाने मालमत्तेचा ताबा बँकेस देण्यात यावा. पी. आर. पराते प्राधिकृत अधिकारी सहाय्यक व्यवस्थापक, पुणे यांनी सुपूर्द नामा नोटीस दिली आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *