करमाळा प्रतिनिधी
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार संजय मामा शिंदे यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी एक कोटी निधी देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. करमाळा शहरामध्ये सर्व महापुरुषांचे स्मारक आहेत परंतु राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नाही. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ करमाळ्यापासून
अवघ्या वीस किलोमीटरवर श्री शेत्र चोंडी तालुका जामखेड या ठिकाणी आहे. परंतु करमाळा शहरांमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून श्री क्षेत्र चोंडी कडे जाताना करमाळा शहरातून जावा लागत असल्यामुळे अनेक अहिल्या प्रेमींनी खंत व्यक्त केली की, करमाळा शहरांमध्ये एक मोठे असं अहिल्यादेवींचे स्मारक
उभारण्यात यावं. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मंदिर, मज्जिद, नदीवरील घाट, विहिरी, तळी अनेक मंदिरांची जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी मोठ्या प्रमाणात केलेली आहेत, परंतु काही राजकीय नेत्यांना अहिल्यादेवींच्या कार्याचा विसर पडत चालला आहे. निवडणुकीमध्ये धनगर समाजाची मते चालतात परंतु राजमाता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी निधी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. जर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर एक कोटी रुपये अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी निधी नाही दिला तर येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये करमाळा तालुक्यातील धनगर समाज त्यांची जागा त्यांना निवडणुकीच्या
माध्यमातून दाखवून देईल असा इशारा अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला. यावेळी धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. गणेश इवरे, आजिनाथ इरकर, कैलास पवार, नवनाथ कोळेकर, नितीन तरंगे, निलेश कोकरे, दादासाहेब खोमणे, दिनकर हुलगे, समाधान मारकड, दादासाहेब महानवर, धनंजय शिंदे, भागवत वाघमोडे, धनंजय कोळेकर आदि जन पदाधिकारी
उपस्थित होते.