कंदर करमाळा
कंदर सोसायटी एका बुद्धि भ्रष्ट व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवर खुलाशाबाबत जुलै 2017 रोजी मी चेअरमन पदावर कार्यरत झालो. त्यावेळेस संस्थेचे रेशन दुकान आहे हे कंदर ग्रामस्थांना माहित झाले कारण प्रस्थापित लोकांनी 35 ते 40 वर्षापासून
एका व्यक्तीला चालविण्यासाठी दिलेले होते. त्याची मक्तेदारी मोडून मी 2017 ला गरीब कुटुंबातील अभ्यासू व्यक्तीला दुकान चालविण्यासाठी मा. सहाय्यक निबंधक करमाळा समोर ठराव करून दिलेला आहे. सदर व्यक्ती संस्थेला वार्षिक 60 हजार
रुपये भाडे स्वरूपात चलनाने संस्थेच्या खात्यावर भरणा करत आहे. मी 3 वर्ष चेअरमन असताना एक लाख 80 हजार रुपये संस्थेला भरणा करून घेतलेला आहे. वास्तविक पाहता प्रस्थापित लोकांनी लोकांचं रक्त पिऊन संबंधित तत्कालीन
दुकानदाराने गैरमार्गाने पैसे कमावून संस्थेला 35 ते 40 वर्षात संस्थेला फक्त 20 ते 22 हजार भरणा केलेला आहे. हा गेंद्याच्या कातडीचा माणूस दुकान चालविण्यापासून बाजूला केल्याने आज अखेरपर्यंत नवनाथ महाडिक या दुकान
चालवणाऱ्या व्यक्तीला त्रास देत आहेत व मागील 3 वर्षापासून त्या दुकानदाराची कमिशन रक्कम अदा केलेली नाही. त्या व्यक्तीला वारंवार पैशाची मागणी केली जात आहे. सदर दुकानदाराने 60 हजार रुपये सचिव जाधव यांच्याकडे भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम तागायत संस्थेच्या अकाउंटला भरले किंवा नाही याची खात्री करावी. आज अखेर पर्यंत 2 लाख 56 हजार रुपये सेल्समन महाडिक यांना संस्थेकडून देणे असून सदर रक्कम न देता त्या व्यक्तीला मानसिक त्रास दिला जात आहे. 2019 ते 2022 पर्यंत कोरोना महामारीमुळे जग थांबलेले असताना कलम 144 लागू असताना मासिक मीटिंग घेणे कितपत योग्य आहे. संस्थेचे माजी चेअरमन हरिभाऊ गरड यांनी कलम 144 लागू असताना बोगस वार्षिक मीटिंग घेतली. याबाबत मी स्वतः जिल्हा उपनिबंधक सोलापूर यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. जनतेच्या हितासाठी सेल्समन म्हणून नियुक्त केलेला नवनाथ महाडिक हा गरीब कुटुंबातील व हुशार आहे. या व्यक्तीला जर त्रास दिला तर भविष्यात आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. करमाळा तालुक्यात तत्कालीन तहसीलदार संजय पवार यांच्या माध्यमातून कंदर सारख्या मोठ्या रेशन दुकानाला प्रथम बायोमेट्रिक पद्धत माझ्या कालखंडात चालू केली. त्यामुळे प्रत्येक गरिबाला धान्य मिळू लागले व कोणत्याही कार्डधारकांची कसलीही तक्रार नाही. संबंधित तक्रारदाराच्या पार्टीचे ग्रामपंचायतला पानिपत झालेले असून त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन खोट्या तक्रारी करण्याचे काम करत आहेत. नवनाथ महाडिक यांना कमिशन पोटी चेक देणे योग्य आहे तो मी दिला आहे. तक्रारदार यांच्या काळातील व विद्यमान चेअरमन यांच्या काळातील कमिशन पोटी असलेली रक्कम नवनाथ महाडिक यांचे देणे 2 लाख 56 हजार रुपये देण्याबाबत विद्यमान चेअरमन यांनी स्वतः लक्ष घालून निर्णय घ्यावा. तसेच सदर दुकानदार यास शासन कमिशन देते संस्था देत नाही अशीही अखेर माहिती मा. चेअरमन अण्णासाहेब पवार यांनी दिली आहे.