करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सपत्नीक करमाळ्यातील भाजपाचे सुहास घोलप यांच्या घरी कौटुंबिक भेट घेतली.
यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदार संघाचे प्रभारी राजकुमार पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, राज्य निमंत्रित सदस्य दीपक चव्हाण,
राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कुंभार, व्यापारी आघाडी अध्यक्ष जितेश कटारिया, माजी सभापती बापूराव गायकवाड, भिवरवाडीचे सरपंच शेळके, लोकमानसचे सहसंपादक नितीन घोडेगावकर, सोशल मीडिया तालुकाप्रमुख नितीन कांबळे, ऍड.
प्रियल अगरवाल, वनराज घोलप, वैभव सपकाळ, संघर्ष दयाळ, संग्राम दयाळ, माजी महिला प्रमुख भाग्यश्री कुलकर्णी, अधिराज घोलप, शार्दुल घोलप आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर भेटी दरम्यान कौटुंबिक चर्चा झाली. परंतु काही नागरिकांचे तसेच कार्यकर्त्यांचे कामे होती ते खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी लागलीच पूर्ण केली. खासदारांनी ताबडतोब कामा संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कामाची पूर्तता करण्यास बजावले. तसेच नगरपालिका संदर्भात खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी नगरपालिके साठी राखीव निधी उपलब्ध आहे. त्या कामासंदर्भात मला सांगा त्याची मी पूर्तता करतो असे सांगितले. यावरूनच त्यांची कार्य तत्परता दिसून येते. त्यांच्या सपत्नीक येण्याने घोलप कुटुंबीयात उत्साहाचे व कौटुंबिक वातावरण तयार झाले होते. त्याचबरोबर छोटेखानी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमही संपन्न झाला. तसेच आलेल्या पाहुण्यांचा घोलप कुटुंबीयांकडून आदर तिथ्य सत्कार सन्मान करण्यात आला.