कंदर करमाळा

संस्थेची कोणतेही पंच कमिटीची सभा झालेली नसताना केलेल्या व्यवहाराबाबत कंदर संस्थेचे तात्कालीन चेअरमन, सचिव यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे हरिभाऊ रामचंद्र गरड यांनी केली आहे.

 निवेदनात म्हटले आहे की,कंदर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा कायदेशीर व कार्यक्षमरीत्या सभासद असून माझ्या संस्थेत रुपये 20 हजार इतका शेअर्स असून मला संस्थेबद्दल आपुलकी व प्रेम आहे. महोदयस विनंती करतो की व दोषीवर कायदेशीर रित्या गुन्हा नोंदवण्यास नम्र विनंती करतो की येणेप्रमाणे.

दिनांक 2-7-2020 ते 18-3 2010 या कालावधीमध्ये मासिक पंच कमिटीची मीटिंग तत्कालीन चेअरमन अण्णासाहेब पंडित पवार व तत्कालीन सचिव राजेंद्र वसंत चांगण यांनी घेतलेली नाही.

दिनांक 17-3-2021 रोजी चेअरमन अण्णासाहेब पंडित पवार व सचिव राजेंद्र वसंत चांगण यांनी 70 हजार 425 रुपयांचा चेक नंबर 1491 नवनाथ भागवत महाडिक यास रेशन दुकानदार कमिशन म्हणून दिलेला आहे. वास्तविक नवनाथ महाडिक यास रेशन दुकान कमिशन देण्याचे काहीच कारण नाही. वास्तविक रेशन दुकानच संस्थेचे आहे.

नवनाथ भागवत महाडिक यांनी तो चेक नं 1491 दिनांक 18-3-2019 रोजी डीसीसी बँक शाखा कंदर येथे वटवून पैसे घेतले आहेत.

नवनाथ भागवत महाडिक यास चेअरमन अण्णासाहेब पवार व सचिव राजेंद्र वसंत चांगण यांचे स्वतःचे सहीने दिलेल्या नवनाथ भागवत महाडिक यांनी उठवलेला चेक नंबर 1491 रक्कम 70 हजार 425 याची व या व्यवहाराची संस्थेचे किर्दवर कोठेही नोंद आढळून येत नाही.

दिनांक 15/03/2021 रोजी चेक नंबर 1486 या चेकने बबन दत्तात्रय विंचू यांना रुपये 5 हजार रु व सागर मोहन शिंदे यांना 6 हजार रुपये चेअरमन आणसाहेब पवार व सचिव राजेंद्र चांगणयांनी बेकायदेशीर रित्या दिलेले आहेत.

वरील सर्व व्यवहारांना संस्थेच्या संचालक मंडळाची मंजुरी घेणे आवश्यक असताना व संस्थेचे संचालक मंडळाचे वरील व्यवहाराचे तारखेस सभा झालेली नसताना कसे चेक देण्यात आले. याची चौकशी होऊन तत्कालीन चेअरमन अण्णासाहेब पंडित पवार व सचिव राजेंद्र वसंत चांगण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हरिभाऊ गरड यांनी केली आहे.

……

या संदर्भात संस्थेचे सचिव राजेंद्र चांगण यांना फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *