करमाळा प्रतिनिधी

ग्रामपंचायत पोंधवडी येथे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक 05/02/24 रोजी पार पडली. या झालेल्या निवडणुकीमध्ये बागल गटाच्या कांताबाई भागवत गाडे यांचा विजय झाला. झालेल्या निवडणुकीचे कामकाज ग्रामसेवक शंकरराव शेंडे यांनी पाहिले.

मागील उपसरपंच विशाल अनारसे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. झालेल्या निवडणुकीमध्ये बागल गटाच्या कांताबाई भागवत गाडे 5-4 मताने विजय झाल्या.

झालेल्या निवडणुकीमध्ये अमोल गाडे, रामदास गाडे, सुदाम क्षीरसागर, वसंत भिसे, बाप्पू पांढरकर, किसन अनारसे, पिनू कोडलिंगे, नामदेव कोडलिंगे, रेवन राऊत यांचे योगदान मोलाचे ठरले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *