करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या यंत्रणेचे नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येतील मंदिरात रामलल्लांची प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर अयोध्येला जाण्याची सर्वांची इच्छा होत आहे.
रामलाल्लांच्या दर्शनासाठी भाजपच्या वतीने अयोध्या राम मंदिर दर्शन अभियान राबविण्यात येत आहे. करमाळा तालुक्यातील राम भक्तांची लवकरच नाव नोंदणी मोहीम सुरू केली जाणार आहे. अशी माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांनी नुकतीच सांगितले आहे.
करमाळा तालुक्यातील आयोध्या दर्शनासाठी राम भक्तांना पाठविले जाणार आहे. यामध्ये प्रथम करमाळा तालुक्यातून दहा राम भक्तांची नियोजन केले आहे व ते लवकरच आयोध्या मध्ये रामलालाचे दर्शन घेतील. माढा लोकसभा मतदारसंघातून
अयोध्या ला नागरिकांना घेऊन जाण्याची नियोजन भाजपने केले आहे. त्यासाठी भाजपामधील समिती कार्यान्वित करण्यात आली आहे. या समिती सदस्यांवर प्रवास दर्शन व भोजन व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपाच्या वतीने
राबविल्या जाणाऱ्या दर्शन अभियनातील साधारणता कालावधी तीन दिवसांचा हा अयोध्या दौरा असणार आहे. लोकसभा मतदारसंघातून अयोध्येला पाठविण्यात येणाऱ्या रामभक्तांची निवड ही विधानसभा मतदार संघनीय केली जाणार आहे करमाळा तालुक्यातील रामभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शशिकांत पवार यांनी केली.